-महावीर सांगलीकर
ही 15 नोव्हेंबरला घडलेली घटना आहे. या दिवशी संध्याकाळी शिवानी द ग्रेट या माझ्या कथेची खरी-खुरी नायिका शिवानी आणि मी प्रसिद्ध संगीतकार हर्षित अभिराज यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमास जाणार होतो. पण त्यादिवशी दुपारी शिवानी अचानक गायब झाली. तिला अनेकदा फोन करूनही तिने फोन उचलला नाही. कांहीतरी गंभीर गोष्ट असल्याशिवाय ती माझा फोन न उचलणे शक्य नव्हते. Whats App वर तिची 'लास्ट सीन' वेळ 1 वाजून 14 मिनिटे दाखवत होती. मी पाच वाजेपर्यंत तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तिचा पत्ता लागेना. काळजी वाटू लागली तेंव्हा मी मनातच न्यूमरॉलॉजीकल हिशेब मांडला. त्या तारखेला तिचा अपघात होणे किंवा तिला अन्य कांही दगा-फटका होणे शक्यच नव्हते याची जाणीव झाल्याने थोडे हायसे वाटले. तिच्या कुटुंबात कांहीतरी घडले असावे असा निष्कर्ष मी काढला.
त्यानंतर सहा वाजता मी एकटाच हर्षित अभिराज यांच्या कार्यक्रमास गेलो. कार्यक्रमाच्या ठिकाणी माझ्या मनात शिवानीचा विचार सारखा येऊ लागला. मग मी डोळे मिटून घेतले आणि अवती-भोवतीचे वातावरण पूर्ण विसरून गेलो. ट्रान्समध्ये जाऊन मनातल्या मनात एक मंत्र पुटपुटला. मग आर्त स्वरात म्हणालो, ‘शिवानी, ताबडतोब संपर्क कर... जिथे असशील तेथून...SHIVANI CONTACT ME IMMEDIATELY ’. मग मी त्या अवस्थेतून बाहेर आलो आणि केवळ 15 ते 20 सेकंदात माझा मोबाईल फोन व्हायब्रेट झाला. शिवानीचा टेक्स्ट मेसेज आला होता: ‘माझ्या मावसभावाचे वडील वारले, तिकडे गेले आहे. मला वेळ मिळताच तुम्हाला कॉल करेन’
टेलेपथीचा हा प्रयोग मी सहसा करत नाही. या संपूर्ण वर्षात असा प्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे.
ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक स्पिरिच्युअल नंबरपैकी म्हणजे 22, 11, 9, 8 किंवा 7 आहे, त्यांना हा प्रयोग जमू शकतो. या व्यक्तिंमध्ये टेलेपथीक मेसेज पाठवण्याची आणि रिसीव्ह करण्याची ताकत इतरांपेक्षा जास्त असते. मेसेज पाठवणारा आणि रिसीव्ह करणारा या दोघांचेही नंबर स्पिरिच्युअल नंबर असतील अशा मेसेजसची देवाणघेवाण सोपी जाते. तसेच आई आणि मुलात, दोन खास मित्रांमध्ये, ज्यांची वेव्हलेंग्थ पराकोटीची जुळली आहे त्यांच्यात संकटकाळात टेलेपथीक संवाद होवू शकतो.
माझा जन्मांक 22 असल्याने तसेच शिवानीचा भाग्यांक 9 आणि जन्मांक 8 असल्याने वरील केसमध्ये असा मेसेज पाठवणे आणि रिसीव्ह होणे शक्य झाले.वर सांगितल्याप्रमाणे हे तीनही नंबर स्पिरिच्युअल नंबर आहेत.
No comments:
Post a Comment